वाचा:
केंद्रीय गृहमंत्रालयाने १७ डिसेंबर रोजी सुबोधकुमार जयस्वाल यांची सीआयएसएफ महासंचालकपदी नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे पाठवला होता. या प्रस्तावाला आज मंजुरी देण्यात आली आहे. सीआयएसएफचे महासंचालक राजेश रंजन नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर या पदाचा अतिरिक्त प्रभार सशस्त्र सीमा दलाचे महासंचालक राजेश चंद्रा यांच्याकडे देण्यात आला होता. आता जयस्वाल यांच्या रूपाने सीआयएसएफला पूर्णवेळ महासंचालक मिळाला आहे.
वाचा:
सुबोधकुमार जयस्वाल हे १९८५च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून यापूर्वी त्यांनी दिल्लीत रॉ मध्ये काम केलेले आहेत. दत्ता पडसलगीकर यांचा मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात सुबोधकुमार जयस्वाल यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. पुढे पडसलगीकर हे राज्याचे झाले आणि ते निवृत्त होताच जयस्वाल यांना बढती मिळाली व महाराष्ट्र पोलिसांचे ते बॉस बनले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अनेकदा जयस्वाल यांच्या प्रतिनियुक्तीची चर्चा झाली. गेल्या महिन्यापासून तर ही शक्यता अधिकच बळावली होती. खुद्द जयस्वाल यांचीच तशी इच्छा होती आणि त्यानुसार त्यांना केंद्राच्या सेवेत नियुक्ती मिळाली आहे.
वाचा:
दरम्यान, सुबोधकुमार जयस्वाल केंद्राच्या सेवेत गेल्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांचा नवा बॉस कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी संजय पांडे, बिपीन बिहारी, हेमंत नगराळे, सुरेंद्र पांडे, डी. के. कनकरत्न आणि रजनीश सेठ या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times