पुणे: येथून आलेल्या प्रवाशांपैकी राज्यात आतापर्यंत ५७ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी पुण्यातील रुग्णांची एकूण संख्या ११ झाली आहे. या सर्व रुग्णांच्या जनुकीय रचनेचा शोध घेण्यासाठी ५२ जणांचे नमुने (एनआयव्ही) येथे पाठविण्यात आले आहेत. ( )

वाचा:

‘पुणे शहर, आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आतापर्यंत १०१७ प्रवासी ब्रिटनहून आले आहेत. त्यामध्ये ९५४ रुग्णांचा शोध लागला असून उर्वरीत रुग्णांचा शोध सुरू आहे. यापैकी शहर जिल्ह्यातील ७९३ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये आतापर्यंत ११ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यात पुणे शहरातील चार, पिंपरी चिंचवडमधील ६ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १ अशा ११ जणांचा समावेश आहे. ११ पैकी १० जणांचे नमुने एनआयव्हीला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.

वाचा:

आठ दिवसांत सुरू होऊ शकतं लसीकरण!

लसीकरणाबाबत महत्त्वाची बातमी हाती आली आहे. राज्यात प्रतिबंधक लसीकरण ( Coronavirus Vaccination ) करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून केंद्र सरकारने सूचना दिल्यानंतर लस उपलब्ध होताच पुढील आठ दिवसांत लसीकरण सुरू होऊ शकते. लशीच्या साठवणुकीसाठी पुणे शहर व जिल्ह्यात पुरेशी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाची प्रतीक्षा आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here