हा किस्सा आज घडला तो ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये. या लीगमध्ये आज होबार्ट ह्युरिकन्स आणि ब्रिस़्बेन बिस्ट यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात होबार्टचा संघ प्रथम फलंदाजी करत होता आणि त्यावेळी १७व्या षटकात ही गोष्ट घडलेली पाहायला मिळाली. ब्रिस्बेनच्या संघाकडून लुईस ग्रेगोरी गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथा चेंडू लुईसने एवढा बाहेर टाकला की त्याला वाईड म्हणावे की नाही, असाच प्रश्न पडला.
लुईसचा हा चेंडू खेळपट्टी सोडून त्याच्या बाहेर गेलेला पाहायला मिळाला. त्यावेळी मैदानातील पंचांनाही चहसू आवरता आले नाही. हा चेंडू झाल्यावर मैदानातील पंच हसत लुईसकडे आले. हा चेंडू टाकत असताना लुईसचा तोल गेला आणि त्यामुळे हा चेंडू एवढ्या बाहेर गेल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पंचांनी लुईसला दुखापत झाली की नाही, याचीही विचारण केली.
पंचांनी हा चेंडू नो बॉल ठरवला. त्यामुळे पुढच्या चेंडूसाठी होबार्टच्या संघाला फ्री- हिट देण्यात आली. लुईसच्या या चौथ्या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या होबार्टच्या डेव्हिड मलानने चांगलाच षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्यात होबार्टच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १५० धावा केल्या होत्या. त्यामुळे ब्रिस्बेनच्या संघाला विजयासाठी १५१ धावांचे आव्हान होते. पण हा सामना चांगलाच रंगतदार झाला. कारण ब्रिस्बेनच्या संघाला यावेळी १४९ धावा करता आल्या आणि होबार्टच्या संघाने फक्त एका धावेने यावेळी विजय मिळवला. या सामन्यात ब्रिस्बेनचा फिरकीपटू मुजीब उर रेहमानने चार षटकांमध्ये १५ धावा देत पाच विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे यावेळी सामनावीराचा पुरस्कारही मुजीब उर रेहमानलाच देण्यात आले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times