पुणे: बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर उभारण्यात आलेले बंद करण्यात येणार आहे. एक जानेवारीपासून या सेंटरमध्ये नवीन रुग्णांची भरती केली जाणार नसल्याचे विभागीय आयुक्त यांनी जाहीर केले आहे. ( Update )

वाचा:

सध्या या कोविड सेंटरमध्ये १५० करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. हे रुग्ण बरे झाल्यानंतर जम्बो सेंटर पूर्णपणे बंद होणार आहे. एक जानेवारीपासून या सेंटरमध्ये नव्याने रुग्ण भरती केली जाणार नाही. आता करोना बाधित रुग्णांवर महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये उपचार केले जाणार आहेत.
याबाबत विभागीय आयुक्त राव म्हणाले, ‘जम्बो सेंटर हे तात्पुरते उभारण्यात आले होते. आता करोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. महापालिकेचे , पिंपरी-चिंचवड महापालिकेतील यशवंतराव चव्हाण रुग्णालय; तसेच बाणेर-बालेवाडी आणि ऑटो क्लस्टर येथील सेंटरमध्येही रुग्णांची संख्या कमी आहे. या ठिकाणी करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे जम्बो सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’.

वाचा:

दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटांची कमतरता निर्माण झाली होती. त्यामुळे ‘सीओईपी’च्या मैदानावर ८०० खाटांचे
जम्बो सेंटर उभारण्यात आले होते. त्यामध्ये ६०० ऑक्सिजनयुक्त आणि २०० आयसीयू खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आता हे सेंटर बंद होत आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here