कोल्हापूर: ‘कुणी फुटला तर त्याचा कार्यक्रम ठरलेला’ हे पालकमंत्री यांचे विधान म्हणजे खुलेआम दहशत पसरविण्याचा प्रकार आहे, असा आरोप शिवसेनेचे शहराध्यक्ष यांनी केला आहे. दरम्यान, माजी आमदार यांनीही सतेज पाटील यांच्यावर तोंडसुख घेतल्यामुळे कोल्हापुरात काँग्रेस आणि यांच्यात वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( Latest News )

वाचा:

चार दिवसांपूर्वी कसबा बावडा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. या मेळाव्यात महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात त्यांनी आम्ही दिलेले उमेदवार अंतिम असतील अशी घोषणा केली होती. हे उमेदवार सर्वांशी चर्चा करून सामोपचाराने ठरवले जातील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती. यानंतर कोणी फुटला तर त्याचा कार्यक्रम करू, असा इशारा त्यांनी दिला होता.

वाचा:

या पार्श्वभूमीवर रविकिरण इंगवले आणि राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मंगळवारी क्षीरसागर यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीत पालकमंत्री पाटील यांची अवस्था २०१४ सारखी होईल असा इशारा दिला होता. आज तातडीने इंगवले यांनीही पत्रकार बैठक घेऊन पालकमंत्री पाटील यांच्या धमकी बाबत निषेध व्यक्त केला. बिहारी पद्धतीने केलेले पालकमंत्र्यांचे भाषण त्यांना शोभत नाही, असा आरोप करताना त्यांनी स्वाभिमानी जनतेने हे खपवून घेऊ नये, असे आवाहनही केले. शिवसेनेच्या नेत्यांनी सुरू केलेल्या या आरोपांमुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या या दोन्ही पक्षात वाद वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here