मुंबई : वर्षाच्या शेवटच्या दिवशी आज गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. पेट्रोल आणि आज ३१ डिसेंबर रोजी स्थिर ठेवला आहे. आज सलग २४ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच आहे. त्यामुळे २०२० मध्ये स्वस्त इंधनाची अपेक्षा धरलेल्या ग्राहकांना अपेक्षाभंग झाला आहे.

आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. तर एक लीटर डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.

मागील वर्षभरात कच्च्या तेलाच्या बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. त्याशिवाय स्थानिक पातळीवरील दुहेरी कर आणि रुपया आणि डॉलरचा चलन विनिमय दर यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमतीवर परिणाम दिसून आला असे मत पेट्रोल डीलर असोसिएशनचे एम. वेंकटराव यांनी सांगितले.

पेट्रोल आणि डिझेलवरील कर आणि व्हॅट कमी करण्याची मागणी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली आहे. करोना टाळेबंदीमध्ये देशभर वाहतूक ठप्प होती. त्यात माल वाहतूकदारांचे मोठे नुकसान झाले. इंधन दरवाढीने वाहतूकदारांचे कंबरडे मोडले असून सरकारने इंधनावरील कर कपात करावी, अशी मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केली आहे.

आज सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाली. क्रूडचा भाव २७ सेंट्सने वाढला आणि ४८.२७ डॉलर प्रती बॅरल झाला. ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल २४ सेंट्सने वधारला आणि तो ५१.३४ डॉलर प्रती बॅरल झाला.

डिझेल २० वर्षांतील उच्चांकी स्तरावरदरम्यान, सलग २४ व्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवल्याने ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. याआधी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात तब्बल ४८ दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. त्यानंतर २० नोव्हेंबरपासून १५ वेळा इंधन दरवाढ झाली. ज्यात पेट्रोल २.५५ रुपयांनी महागले. तर याच कालावधी १२ वेळा डिझेल दरवाढ झाली. ज्यात डिझेलचा भाव ३.४१ रुपयांनी वधारला. यामुळे पेट्रोल २०१८ मधील सार्वकालीन उच्चांकी स्तराच्या नजीक पोहचले आहे. तर ८०.५१ रुपयांवर असलेले डिझेल २० वर्षांतील उच्चांकी स्तरावर आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here