मुंबई: लाखो चाकरमान्यांचं लक्ष लागून राहिलेली मुंबईतील उपनगरीय लोकल वाहतूक नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात सर्वांसाठी खुली होणार का, या प्रश्नाचं उत्तर आरोग्यमंत्री यांनी दिलं आहे. ” च्या संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असं टोपे यांनी सांगितलं आहे. त्यामुळं संभ्रम कायम आहे. ( on Resuming )

‘लोकल वाहतूक ही मुंबईची जीवनवाहिनी आहे याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळंच सरकार साथरोगाच्या परिस्थितीवर व रुग्णांच्या आकड्यांवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. करोना पसरत नसल्याची वा रुग्णवाढ होत नसल्याची खात्री होताच ही सेवा सुरू केली जाईल,’ असं टोपे यांनी सांगितलं.

वाचा:

मुंबई लोकल ट्रेनमधून दिवसाला अंदाजे ८० लाख लोक प्रवास करतात. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रव्यापी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मार्च अखेरपासून मुंबई लोकल सेवा देखील बंद करण्यात आली आहे. सध्या सरकारी कर्मचारी, वकील, बँक कर्मचारी व अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना विशेष पासच्या आधारे लोकल प्रवास करण्याची मुभा आहे. महिलांना देखील ११ ते ३ व सायंकाळी ७ नंतर प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, ही सेवा पुरेशी नसल्यानं विविध स्तरांतून सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी होत आहे.

वाचा:

काही दिवसांपूर्वीच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नव्या वर्षात लोकल ट्रेन सुरू करण्याचे संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतीत सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यातच ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू आढळल्याचं समोर आलं. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लॉकडाऊन ३१ जानेवारीपर्यंत वाढवला आहे. त्यामुळं लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here