वाचा:
सुबोध जयस्वाल यांनी केंद्र सरकारनं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंलाचलकपदी नियुक्ती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. ‘पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता राज्यातील पोलीस विभागाचा कारभार सुरू आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालंय. त्यामुळं नाराज होऊनच जयस्वाल यांनी प्रतिनियुक्ती मागितली होती. ती केंद्र सरकारनं स्वीकारली,’ असं फडणवीस म्हणाले.
वाचा:
‘पोलीस विभाग हा गृहखात्याच्या अंतर्गत येत असला तरी तो एक स्वतंत्र व स्वायत्त विभाग आहे. गृहमंत्र्यांचं व मुख्यमंत्र्यांचा काम त्यावर देखरेख करण्याचं आहे. हे राज्य सरकारनं समजून घेतलं पाहिजे. मात्र, आता छोट्यातल्या छोट्या बदल्यांपासून प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळंच जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला. ‘पोलिसांच्या मनोधैर्यावर याचा काय परिणाम होईल ही वेगळा भाग आहे. माणसं येत, जात असतात. पण चांगली माणसं अशा प्रकारे घालवणं हे योग्य नाही. महाराष्ट्रासाठी हे भूषणावह नाही,’ असं फडणवीस म्हणाले.
वाचा:
पोलीस दलाशी संबंधित काही निर्णयावरून सुबोध जयस्वाल व राज्य सरकारमध्ये विसंवाद होता. त्यामुळं जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत परतण्याची परवानगी राज्य सरकारकडं मागितली होती. ती मान्य करण्यात आली. जयस्वाल यांच्या जागी पोलीस महासंचालक म्हणून कुणाची वर्णी लागणार, यावरून आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times