मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज त्यांच्यावरील बलात्काराचा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला.
‘मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. माझे मोबाइल रेकॉर्ड तपासा, अगदी नार्को टेस्टही करा. दोषी असलो तर फासावर जायला तयार आहे,’ असं शेख यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. मेहबूब शेख यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. ( on Rape Allegations)

मागील महिन्यात १४ नोव्हेंबर रोजी मेहबूब शेख यांनी भेटायला बोलावून माझ्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेनं औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीनंतर भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. त्याविरुद्ध भाजपकडून आंदोलनही केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजपचे लोक सत्ताधारी नेत्यांवर खोटेनाटे आरोप करत आहेत. शेख यांच्यावरील आरोपांमागे देखील असेच षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला.

वाचा:

शेख यांनीही सविस्तरपणे आपली बाजू मांडली. ‘संबंधित महिलेनं दिलेल्या फिर्यादीत माझं नाव आणि पत्ता आहे हे खरं आहे. मात्र, माझा त्या महिलेशी अजिबात संबंध नाही. ही माहिती समजल्यावर मी स्वत: पोलिसांशी संवाद साधला होता, असं ते म्हणाले. ‘आरोप करणाऱ्या महिलेला मी काळी-गोरी पाहिलेली नाही. माझा मोबाइल रेकॉर्ड काढा. नार्को टेस्ट करा. सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा राजकारणात प्रगती करतोय, त्याला बदनाम करण्याचा प्रकार होत असला तर ते दुर्दैवी आहे. हे होता कामा नये. मी कुठल्याही चौकशीस सामोरा जायला तयार आहे. केवळ राजकीय द्वेषापोटी हे केलं गेलंय का त्याचा तपास व्हायला हवा,’ असंही ते म्हणाले.

वाचा:

‘तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे १० तारखेला महिलेला फ्लॅटवर बोलवलं गेलं होतं. मात्र, ९, १० व ११ या तिन्ही दिवशी मी मुंबईत होतो. १४ तारखेला अतिप्रसंग झाला असं फिर्यादीत म्हटलंय. त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं. त्या दिवशी मी पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये होतो. अनेक व्यापाऱ्यांना भेटलो. गुरुजींच्या घरी जेवण घेतलं. कॉल डिटेल काढा. कृपा करून जीवन उद्ध्वस्त करू नका. महिलेचीही नार्को टेस्ट करा. तिचा बोलविता धनी कोण हे देखील समोर आलं पाहिजे,’ असंही ते म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here