‘ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. हे बक्षीस म्हणजे त्यांनी लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, अशी टीका राम शिंदे यांनी केली होती. त्याचबरोबर, राज्य निवडणूक आयोगानं त्यांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. राम शिंदे यांच्या या टीकेवर रोहित पवारांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘गावात गटतट असावेत असा त्यांचा हेतू असावा मात्र माझा हेतू गटतट नसावेत असा आहे. गावाच्या विकासासाठी सर्व लोक एकत्र येत असतील तर त्याला काय हरकत आहे?,’ असा सवाल करतानाच बक्षीस जाहीर करण्यामागे माझा प्रामाणिक हेतू होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘गावकऱ्यांनी गट तट विसरुन विकासाचं राजकारण करावं. त्यांना विकासाचं काम कळत नसेल. त्यांना गट तट कळत असतील त्याला मी काय करु. राम शइंदे काय बोलतात त्यापेक्षा लोकांना काय पाहिजे, हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाच आहे. लोकांच्या हिताच्या दृष्टीनं मी यापुढे काम करत राहील,’ असा ठाम विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times