वाचा:
याबाबत बोलताना देशमुख म्हणाले, ‘मी स्वतःला महाराष्ट्र पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख मानतो. करोना साथीच्या काळात माझे सर्व सहकारी अथक परिश्रम करत होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी मी ३२ जिल्ह्यांमध्ये दौरे केले होते. मी त्यांच्या सोबत आहे याची जाणीव करून देण्याचा उद्देश त्यामागे होता. प्रत्येक उत्सवात व सणासुदीच्या काळात पोलीस दल रस्त्यावर असते. आजचा दिवसही त्याला अपवाद नसेल. संपूर्ण जग नववर्षाचं स्वागत करत असेल. जल्लोष करत असेल तेव्हा माझे सहकारी सर्व जनतेच्या व महाराष्ट्राच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावत असतील. म्हणूनच या क्षणी मी त्यांच्या सोबत राहणार आहे.’
वाचा:
‘पोलीस नियंत्रण कक्षातील माझ्या कर्मचाऱ्यांना सतत ‘अलर्ट’ राहावं लागतं. त्यांच्या कामाच्या तुलनेत त्यांना मानसन्मान वा अधिकार मिळत नाही. हा विभाग काहीसा दुर्लक्षित आहे. त्यामुळंच ३१ डिसेंबरच्या रात्री पोलीस नियंत्रण कक्षात जाऊन मी तिथल्या कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणार आहे. एवढंच नव्हे, त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. त्यांच्या सोबत कामही करणार आहे,’ असं देशमुख यांनी सांगितलं.
होप २०२१
‘सरत्या वर्षावर करोनाच्या साथरोगाचे मळभ होते. येणारं वर्ष आशादायी असणार आहे. यासाठी ‘होप २०२१’ असं लिहिलेला केक पोलीस सहकाऱ्यांसोबत कापून आनंदाचे चार क्षण निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल,’ असंही ते म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times