मुंबईः मराठी नाही तर अॅमेझॉन नाही, अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेनं आता डॉमिनोजला थेट इशारा दिला आहे. डॉमिनोजच्या अॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नसल्यानं तसा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मनसेनं केली आहे.

मराठीवरुन मनसे आणि अॅमेझॉन कंपनीत काही दिवसांपासून संघर्ष सुरु होता. या पार्श्वभूमीवर अॅमेझॉननं मुंबईतील दिंडोशी येथील दिवाणी न्यायलयात धाव घेतली होती. अखेर या वादावर पडदा टाकत कंपनीनं अॅमेझॉनची वेबसाइट व मोबाइल अॅपवर मराठी झळकणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता पिझ्झा आणि इतर खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजलाही मराठीच्या मुद्द्यावर इशारा दिला आहे.

डॉमिनोजनंही मनसेच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच डॉमिनोजच्या अॅप व वेबसाइटवर मराठीचा योग्य तो सन्मान दिला जाईल, असं ठाम अश्वासन दिलं आहे. तसंच, मराठीत अॅप्लिकेशन सुरु करण्याची तयारीही दर्शवली आहे. तसं पत्रच डॉमिनोजनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सादर केलं आहे.

काय आहे प्रकरण?

‘मराठी नाही तर अॅमेझॉन नाही’ अशी भूमिका घेत मनसेने अॅमेझॉन विरुद्ध खळखट्याक आंदोलन सुरू केले होते. अॅमेझॉनची वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर इतर भाषांप्रमाणे मराठीतही सेवा उपलब्ध व्हायला हवी, अशी मनसेची मागणी होती. याबाबत मुंबई अनेक ठिकाणी मनसेने फलक लावले असून मराठीचा आग्रह धरत अॅमेझॉनला निर्वाणीचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर मनसेपासून संरक्षण मिळवण्यासाठी अॅमेझॉनने कोर्टात धाव धेतली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here