मुंबई: करोना संकटाच्या सावटाखालीच सर्वांना सरत्या वर्षाला निरोप द्यावा लागत आहे. २०२० मध्ये जी वेदना, कुचंबणा, फरफट वाट्याला आली ती नव्या वर्षात येऊ नये, असे प्रत्येकाला वाटत आहे. नव वर्ष करोनामुक्तीचं असावं, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यावरच बोट ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद लवकरच मिळो’, अशी मनोकामना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ( Maharashtra Deputy CM Update )

वाचा:

‘मावळतं वर्ष करोना संकटाशी लढण्यात गेलं, येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो, नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग करोनामुक्त होवो, सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२१ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा:

‘मावळत्या २०२० वर्षानं आपल्याला जीवन जगण्यासंदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकवल्या. त्या गोष्टींपासून बोध घेऊन नववर्षाची सुरुवात करूया. करोनाचं संकट अद्याप कायम असल्यानं मास्क लावणं, गर्दी टाळणं, हात वारंवार धूत रहाणं या त्रिसूत्रीचं पालन करूया. करोनापासून स्वत:चं, कुटुंबाचं, समाजाचं संरक्षण करीत दैनंदिन व्यवहार हळूहळू काळजीपूर्वक सुरू करूया’, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नववर्षानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.

वाचा:

येणारं नवीन वर्ष राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्व बांधवांना विकासाची संधी उपलब्ध करून देणारं, राज्याला सर्वांगिण प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या संदेशात व्यक्त केला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here