मुंबई: राज्यात आज ५८ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ३ हजार ५०९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ३ हजार ६१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील करोना रिकव्हरी रेट सध्या ९४.६४ टक्के इतका असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५२ हजारांपर्यंत खाली आली आहे. सरत्या वर्षाला निरोप देत असताना नव्या करोनाचं संकट घोंगावत आहे आणि त्यात राज्यासाठी आजची आकडेवारी काही प्रमाणात दिलासा देणारी ठरली आहे. ( )

वाचा:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्गाचा ग्राफ वेगाने खाली येत आहे. करोनामृत्यूंचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे. मुंबई, आणि या तीन प्रमुख शहरांमधील स्थिती सध्या नियंत्रणात आहे. येथील दैनंदिन रुग्णसंख्या बरीच कमी झाली आहे. आजची आकडेवारी पाहिल्यास राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंतचा एकूण मृतांचा आकडा ४९ हजार ५२१ इतका झाला आहे. त्यात सर्वाधिक ११ हजार ११६ मृत्यू पालिका हद्दीत झाले आहेत. सध्या राज्यातील २.५६ टक्के इतका असून तो आणखी कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

वाचा:

गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ५०९ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर त्यापेक्षा किंचित जास्त म्हणजे ३ हजार ६१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख २८ हजार ५४६ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.६४ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २७ लाख ४७ हजार ६३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ३२ हजार ११२ (१५.१६ टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८१ हजार ३०३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३ हजार ५७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह अर्थात उपचार घेत असलेल्या करोना बाधित रुग्णांची संख्या ५२ हजार ९०२ इतकी खाली आली आहे. त्यात सर्वाधिक १३ हजार ५७२ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर ठाणे जिल्ह्यात १० हजार २२८ आणि मुंबईत ९ हजार ३२५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here