जयपूर: काँग्रेस नेते यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वक्तव्य दिलं आहे. सावरकरांनीच सर्वात आधी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत दिला होता. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडल्यानंतर तीन वर्षानंतर मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीचा ठराव केला होता, असं विधान थरूर यांनी केलं आहे. सावरकर, गोळवलकर आणि दीनदयाल उपाध्याय हे धर्माच्या आधारे राष्ट्रीयता निश्चित करण्याच्या मताचे होते, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. त्यामुळे थरूर यांच्या विधानावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

जयपूरच्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये संवाद साधताना शशी थरूर यांनी हे विधान केलं. १९४०मध्ये मुस्लिम लीगचं लाहोर येथे अधिवेशन पार पडलं होतं. या लाहोर अधिवेशनातच पाकिस्तान निर्मितीचा ठराव मांडण्यात आला होता. त्यापूर्वी तीन वर्षाआधीच सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता, असं थरूर म्हणाले. फाळणीच्या काळात राष्ट्राची ओळख धर्माच्या आधारे असावी काय? असा मुद्दा चर्चेला जात होता. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूसहीत अनेक नेत्यांनी धर्माच्या आधारे व्यक्तिची ओळख होऊ शकत नसल्याचं म्हटलं होतं. धर्म तुमची राष्ट्रीयता निश्चित करू शकत नाही. आपण सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी लढाई लढली आणि सर्वांसाठी देश निर्माण केला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हिंदुंसाठीच भारत पितृभूमी आणि पुण्यभूमी असल्याचं सावरकरांनी म्हटलं होतं. सावरकरांच्या परिभाषेत सांगायचं झालं तर या श्रेणीत हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन येतात. मात्र मुसलमान आणि ख्रिश्चन येत नाहीत, असं सांगतानाच हिंदुत्वाच्या आंदोलनाने संविधानाला नाकारल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी थरूर यांनी त्यांच्या पुस्तकाचा हवालाही दिला. माझ्या व्हाय आय अॅम हिंदू या पुस्तकात सावरकर, गोळवलकर आणि दीनदयाल उपाध्याय यांचा हवाला देण्यात आला आहे. धर्माच्या आधारे राष्ट्रीयता निश्चित व्हावी असं या नेत्यांना वाटायचं, असंही त्यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here