नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला मोठा झटका दिला होता. युवराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयची परवानगी मागितली होती. पण बीसीसीआयने ही परवानगी नाकारली. त्यानंतर युवराजचे वडिल योगराज सिंग यांनी बीसीसीआयला नेमकं कोणतं नुरकसान होऊ शकते, याबाबत इशारा दिला आहे.

नेमके काय आहे प्रकरण, पाहा…युवराज सिंगला देशांतर्गत टी-२० लीग सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ( syed mushtaq ali trophy ) खेळायचे होते. युवराज सिंग पंजाब संघाकडून खेळणार होता. या स्पर्धेसाठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला होता. पण बीसीसीआयने युवीचे क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याचे स्वप्न भंग केले. जो खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळला आहे, त्याला पुन्हा भारतामध्ये क्रिकेट खेळता येणार नाही. युवराजला यापुढे आयपीएलही खेळता येणार नाही, असे बीसीसीआयने युवराजला सांगितले होते.

योगराज सिंग यांनी बीसीसीआयला काय सांगितले, पाहा…योगराज सिंग यांनी याप्रकरणी बीसीसीआयला सांगितले की, ” जर युवराजला खेळण्याची संधी दिली तर युवा खेळाडूंना त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. मला ही गोष्ट नेमकी कशी घडली याचे कारण माहिती नाही, पण मी युवराजशी याबाबत नक्कीच संवाद साधणार आहे. पण मला वाटते की, बीसीसीआयने निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी द्यायला हवी. कारण यामुळे अनुभवी खेळाडूबरोबर खेळण्याची संधी युवा खेळाडूंना मिळेल आणि त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. कारण युवा खेळाडूंना अनुभवी क्रिकेटपटूंपासून बरेच काही शिकता येऊ शकते. पण याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार नक्कीच बीसीसीआयला आहे.”

युवीने १० जून २०१९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याचवेळी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार नाही असे म्हटले होते. काही महिन्यांपूर्वी त्याने पुन्हा क्रिकेट खेळणार असल्याचे जाहीर केले. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भारतातील देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरू होणार आहे. सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत युवराजला खेळायचे होते. पण बीसीसीआयने राज्य संघात त्याच्या निवडीला परवानगी नाकारली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here