जळगाव: जिल्ह्यातील ७८३ ग्रमापंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या महिला प्रवर्गाच्या जागेत तृतीयपंथीयाने दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावरून गोंधळ झाला. अर्जावर हरकत घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज बाद ठरविल्याने तृतीयपंथीयांनी संताप व्यक्त करीत तहसील प्रशासनाला धारेवर धरले व गोंधळ घातला. ( Latest News )

वाचा:

जळगाव तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामक तृतीयपंथीयाने सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा असलेल्या एका वॉर्डातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रेही जोडली. गुरुवारी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जावर हरकत घेत अर्ज बाद केला. तृतीयपंथीय असल्याने त्यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही, असे कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले. यावरुन अंजली पाटील यांनी संताप व्यक्त केला. चुकीची हरकत घेऊन अर्ज बाद केला आहे. हा आपल्यावर अन्याय असल्याचा दावा त्यांनी केला.

वाचा:

तृतीयपंथीयांकडून संताप; कार्यालयात गोंधळ

अंजली पाटील यांचे सहकारी तथा वंचित बहुजन युवा आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या यांनी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारत गोंधळ घातला. एका तृतीयपंथीयाने सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडणूक लढवू नये, याबाबत राज्य निवडणूक आयोगाचा काही निर्णय आहे का? असेल तर तसे लेखी द्यावे, अशी मागणी शमिभा पाटील यांनी केली. जोवर अंजली पाटील यांच्या निवडणूक अर्जाविषयी योग्य तो निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण तहसील कार्यालयातून हलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने त्यांची समजूत घालताना अधिकाऱ्यांचे नाकीनऊ आले.

वाचा:

अर्ज वैध असल्याचा अंजली पाटलांचा दावा
तृतीयपंथीय अंजली पाटील यांनी सांगितले की, मी एक तृतीयपंथीय आहे. सर्टिफाईड ट्रान्सजेंडर असल्याबाबत माझ्याकडे प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. एवढेच नव्हे तर भारत सरकारने दिलेले आधार कार्ड, मतदार ओळखपत्रही आहे. त्यावर देखील माझा तृतीयपंथीय म्हणून उल्लेख आहे. त्यामुळे मला निवडणूक लढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने माझा उमेदवारी अर्ज बाद केला आहे. माझा अर्ज जर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून दाखल करता येत नव्हता तर मला अर्ज दाखल करतेवेळी किंवा अर्ज बाद करण्यापूर्वी विहित वेळेत कळवायला हवे होते. आता मला न्याय हवा आहे, असे अंजली पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here