अभिनेत्री यांच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. ” या मुलाखतीतच्या कार्यक्रमाअंतर्गत सुलेखा तळवलकर यांनी निशिगंधा वाड यांची मुलाखत घेतली होती. खासगी आयुष्य, सिनेसृष्टी, अशा अनेक विषयांवर गप्पा मारताना एका प्रश्नाचं उत्तर देताना निशिगंधा यांनी LGBTQ संदर्भात वक्तव्य केलं आहे.
खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील समतोल, याबद्दल बोलताना निशिगंधा यांनी काहीशा वेगळ्या विषयावर बोलण्यास सुरुवात केली. आपलंच कौतुक करण्यापेक्षा जरा वेगळ्या विषयावर बोलू,असं त्या म्हणाला.
‘मला ना निसर्गाच्या विरोधात जाणारा अनैसर्गिक प्रवास थोडा पचनी नाही पडत समलिंगी संबंधाबाबत माझं वैयक्तिक मत थोडं वेगळं आहे. माझ्या मुलीला मी या विषयावर बोललेलं आवडत नाहीए. आताच्या पिढीला असं वाटतं की हाऊ कॅन यू कॉन्ट्रॅडिक्ट? (तुम्ही विरोधी मत कसं मांडू शकता) तुम्ही नॉर्मल नाहीत का?. प्रत्येकाला वैयक्तिक आवडीनिवडी प्राधान्य आहे. प्रत्येकाला निवडीचा अधिकार आहे, पण उपचार पण आहेत की…’असं निशिगंधा म्हणाल्या.
अशा लोकांबद्दल आपण मानवी हक्कांबद्दल बोलतो.मला सगळ्या गोष्टी कळतायत असं नाहीए, पण अशा जोडप्यानं एखादं मुल दत्तक घेतलं तरी त्या मुलाच्या मानवी, हक्कांचं काय? हा प्रश्नच उभा राहतोच ना? त्या मुलांच्या नैसर्गित आई आणि वडिलांची ओळख करून द्यायची? त्यांच्या मानवी हक्कांचं काय? त्यांना ह्यूमन राईट्सबद्दल समजेपर्यंत ते गोंधळेली नसतील का? असं निशिगंधा म्हणाल्या.
वाद वाढत असल्याचं पाहून निशिगंधा यांनी माफी मागितली आहे. ‘एलजीबीटीक्यू समूह किंवा कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्यामुळं कोणी दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते’,असं त्या म्हणाल्या.’मी सामाजिक क्षेत्रात काम करतेय तृतीयपंथींसोबतही काम चालतं. मला कोणावरही आरोप करण्याचा हेतू नव्हता. गे असणं, लेस्बियन असणं ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यासंदर्भात मी बोलू शकत नाही. होमोफोबिया अशी माझी मनोवृत्ती देखील नाही, असं डॉ. निशिगंधा यांनी म्हणाल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times