खुद्द पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ‘सामना’च्या अग्रलेखातून माझ्याविरोधात गलिच्छ लिखाण केलं जातं. मागे औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याविषयी मी जेव्हा बोललो, तेव्हा माझ्याविरुद्ध लिहिलं गेलं. ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी ही मागणी केली होती, असं अग्रलेखात म्हटलं गेलं होतं. अलीकडंच संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली. त्यानंतरच्या अग्रलेखातही वाईट भाषा वापरण्यात आली होती. त्याबद्दल मी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. रश्मी वहिनी संपादक असलेल्या वृत्तपत्राचं असं संपादकीय असू शकत नाही,’ असं पाटील म्हणाले.
संभाजीनगर झालंच पाहिजे!
औरंगाबादच्या नामांतराविषयी देखील ते सविस्तर बोलले. ‘शिवसेनेनं आता बाळासाहेबांची मागणी लावून धरावी. काँग्रेसनं नामांतराला विरोध केलाय. त्यावर शिवसेनेनं काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्यातील विसंवादाचं आम्हाला घेणंदेणं नाही. आमची भूमिका ठरलेली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर व्हायलाच पाहिजे,’ असं पाटील म्हणाले. ‘जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळवून देणं हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. त्यातही मुंबई महापालिका हे आमचं लक्ष्य आहेच. थेट दिल्लीहूनही मुंबईवर लक्ष दिलं जाईल,’ असं पाटील यांनी यावेळी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times