यासंदर्भात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे जे व्याजदर होत तेच व्याजदर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या तिमाहीमध्येही कायम राहतील.
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने गुरुवारपासून आपल्या कर्मचारी सभासदांच्या खात्यात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवरील (ईपीएफ) आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचे ८.५ टक्के व्याज जमा करण्यास सुरुवात केली. याचा फायदा सहा कोटींहून अधिक सभासदांना होणार आहे. अनेक सभासदांच्या खात्यात हे व्याज जमा झालेले लवकरच दिसू लागणार आहे.
ईपीएफवर मिळणाऱ्या ८.५ टक्के व्याजामध्ये ०.३५ टक्के रक्कम ही भांडवली लाभातून ईपीएफओ देत आहे, तर संघटनेने केलेल्या डेट गुंतवणुकीतून मिळालेल्या रकमेतून उर्वरित ८.१५ टक्के व्याज दिले जात आहे. यापैकी ०.३५ टक्के भांडवली लाभाची रक्कम ईपीएफओने आपल्या सभासदांच्या बँक खात्यात जमा केली आहे.
असे असतील व्याजदर (टक्के)
योजना | व्याजदर |
पाच वर्षीय ज्येष्ठ नागरिक बचत योजना | ७.४ |
बचत खात्यातील रक्कम | ४ |
सुकन्या समृद्धी योजना | ७.६ |
किसान विकास पत्र | ६.९ |
एक ते पाच वर्षीय टर्म ठेवी | ५.५ ते ६.७ |
पाच वर्षीय आवर्ती ठेव | ५.८ |
पीपीएफ | ७.१ |
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र | ६.८ |
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times