नवी दिल्ली: आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील नागरिकांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी हाती येत असून, (serum institute) निर्मिती करत असलेल्या कोविशिल्ड () या करोनाच्या लशीच्या वापराला देण्यात आली आहे. याबाबत गठीत करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आज तक या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या (एसआयआय) कोविशिल्डला पॅनलकडून मंजुरीसाठी शिफारस प्राप्त झाली असल्याचे वृत्त आजतकने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. असे असले तरी यावर अंतिम निर्णय DCGI घेणार आहे.

या महत्वाच्या बैठकीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टीट्यूट या तिन्ही कंपन्यांना आपले प्रेझेंटेशन द्यायचे होते. या बैठकीत झायडस कॅडिला देखील सहभागी झाली. सीरम इन्स्टीट्यूटचे प्रेझेंटेशन झाल्यानंतर कोविशिल्डला मंजुरी देण्यात आली. तज्ज्ञांच्या समितीच्या बैठकीत भारत बायोटेकच्या प्रेझेंटेशननंतर शेवटी फायझरचे प्रेझेंटेशन होणार आहे.

तज्ज्ञांच्या या समितीच्या दोन बैठका झालेल्या आहेत. या बैठकांमध्ये लस निर्मिती कंपन्यांकडून माहिती मागवण्यात आली होती. या बैठकीतून चांगले वृत्त हाती आल्यानंतर काही तासांमध्येच लोकांना पहिला लशीचा डोस देण्याबाबतचे वृत्त देखील मिळणार आहे, अशी आशा व्यक्त केली जात आहे. भारताने करोनाचा पराभव करण्याची तयारी पूर्ण केली आहे. संपूर्ण अॅक्शन प्लान तयार आहे. भारतात लस देण्याची मोहीम इतकी व्यापक असणार आहे की, ते पाहून जगभर आश्चर्य व्यक्त केले जाईल, असेही बोलले जात आहे.

क्लिक करा आणि वाचा बातमी-

कोविशिल्डचे ५ कोटी डोस तयार

सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने आतापर्यंत कोविशिल्डच्या सुमारे ४ ते ५ कोटी डोसचे उत्पादन केले आहे. पुढील वर्षी कंपनीचे १० कोटी डोस तयार करण्याचे उद्दीष्ट असल्याचे कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे. कोविशिल्ड लशीचे उत्पादन सरकारच्या मागणीनुसार ठरेल असेही कंपनीने म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि पाहा फोटोफीचर-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here