महाराष्ट्रातील पोलीस उपनिरीक्षक मिठू नामदेव जगदाळे, पोलीस नाईक सुरपत बावाजी वाडे, हवालदार आशिष मारोती हलामी, विनोद चैत्राम राऊत, नंदकुमार उत्तरेश्वर आगरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. एमसीव्ही माहेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक समीरसिंग द्वारकोजीराव साळवे, नायब हवालदार अविशान अशोक कांबळे, हवालदार वसंत भूछाया आत्राम आणि हमीत विनोद डोंगरे यांना राष्ट्रपती शौर्य पोलीस पदक जाहीर करण्यात आलं असून केंद्रीय गृहमंत्रालयाने या पुरस्कारांची घोषणा केली आहे.
अर्चना त्यागींना राष्ट्रपती वरिष्ठ सेवा पदक
राज्य राखीव दलाच्या अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी यांना राष्ट्रपती वरिष्ठ सेवा पदक जाहीर झालं आहे. डीजीपी संजय सक्सेना, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत प्रभाकर सांडभोर आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक वसंत रामचंद्र साबळे यांनाही राष्ट्रपती वरिष्ठ सेवा पदक जाहीर झालं आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांना पुरस्कार जाहीर
तर, जीवावर उदार होऊन नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या महाराष्ट्रातील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनाही विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या एकूण १०४ कर्मचाऱ्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी, १३ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती अग्नीसुरक्षा सेवा शौर्य पदक, २९ कर्मचाऱ्यांना अग्नीसुरक्षा सेवा शौर्य पदक, १२ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती अग्नीसुरक्षा विशिष्ट सेवा पदक आणि ५० कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अग्नी सेवा पदक जाहीर करण्यात आले आहेत.
होम गार्ड आणि नागरी संरक्षण पुरस्कारांसाठी यंदा ४९ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी, राष्ट्रपती होमगार्ड आणि नागरी संरक्षण विशिष्ट सेवा पदक २ कर्मचाऱ्यांना आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल होम गार्ड आणि नागरी संरक्षण पदक ४७ कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले आहेत.
राज्यातील अग्नीशमन दल, होम गार्ड आणि नागरी संरक्षण पदक विजेत्यांची नावे
>> प्रभाकर सूरजलाल रहांगदले– मुख्य अग्निशमन अधिकारी
>> राजेंद्र अभयचंद्र चौधरी- उप अग्निशमन अधिकारी
>> रवींद्र नारायणराव आम्बुलगेकर- विभागीय अग्निशमन अधिकारी
>> मिलिंद नामदेव दोंदे- एडीएएफओ
>> अभिजित गंगाराम सावंत- स्टेशन अधिकारी
>> सुधीर रमेश वर्तक– ड्रायव्हर ऑपरेटर
>> दिलीप महादेव पालव- उपमुख्य अग्निशमन अधिकारी
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times