नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात () ४ जानेवारीला केंद्र सरकारची महत्वाची बैठक होत असून या बैठकीत काहीच निघू शकले नाही, तर आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करून असे स्वराज इंडियाचे नेते () यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ३७ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. या दरम्यान आज शुक्रवारी शेतकरी संघटनांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर यादव बोलत होते.

३० तारखेला झालेल्या चर्चेतून केवळ शेपूट निघाले आहे, हत्ती निघणे अजूनही शिल्लक आहे. यात दोन मोठ्या मुद्द्यांवर केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे रद्द करणे आणि एमएसपीसंदर्भात सरकार कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. यामुळे आता आम्ही आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत, असे योगेंद्र यादव यांनी सांगितले.

४ तारखेच्या चर्चेतून जर काहीच निघू शकले नाही, तर मग ६ तारखेला जीटी करनाल रोडवर ट्रॉली यात्रा काढणार, असे ते पुढे म्हणाले. सरकार मानलेच नाही तर मग पुढील आठवड्यात एखादी तारीख निश्चित करून शाहजहानपूर सीमेवर दिल्लीच्या दिशेने आम्ही कूच करू. आम्ही देशभरात कृषी कायद्यांसंदर्भात जनजागृती अभियान देखील चालवणार आहोत, असे यादव यांनी स्पष्ट केले आहे.

क्लिक करा आणि वाचा बातमी-

किमान समर्थन मूल्यासाठी (एमएसपी) कायद्याची हमी आणि कृषी कायदे रद्द करण्याला कोणताही पर्याय नाही, असे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीची बैठकही पार पडली. मात्र या बैठकीतही दोन वादग्रस्त मुद्द्यांवर सहमती होऊ शकली नाही. बुधवारी सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये सहाव्या फेरीची चर्चा झाली. ही चर्चा सुमारे ५ तास चालली. यात वीज दरांमध्ये वृद्धी आणि पेंढा जाळण्यावर दंड आकारण्याबाबतच्या मुद्द्यांवर सहमती झाल्याचे समजते.

क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here