मुंबई: येथे थर्टी फर्स्ट पार्टीत झालेल्या मारहाणीत एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. असे या २१ वर्षीय तरुणीचे नाव असून खार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत पार्टीमध्ये सहभागी झालेल्या एका जोडप्याला अटक केली आहे. ( )

वाचा:

खारमधील या इमारतीच्या टेरेसवर गुरुवारी थर्टी फर्स्ट पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इमारतीमधील रहिवाशी तसेच त्यांची काही जवळची मित्र मंडळी या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. जान्हवी पार्टीत सहभागी होण्यासाठी टेरेसवर पोहचली त्यावेळी एक जोडपे आक्षेपार्ह स्थितीत तिथे बसले होते. जान्हवीने याबाबत आक्षेप घेतला आणि त्यांना हटकले. यावरून या जोडप्यासोबत जान्हवीचा वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनी तिला धक्काबुकी करण्यास सुरुवात केली. या जोडप्याने जान्हवीला मारहाण केली आणि केसाला धरून फरफटत दुसऱ्या मजल्यापर्यंत नेले, असे सांगण्यात येत आहे. फरफटत नेत असतानाच जान्हवीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.

वाचा:

घटना समोर येताच मुंबईचे सहपोलिस आयुक्त , अतिरिक्त पोलिस आयुक्त , उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी नेमके काय घडले याबाबत पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांकडून जाणून घेतले जात असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या जोडप्याला अटक केल्याचे हा अधिकारी म्हणाला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here