याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसईसीने लशीच्या आपत्कालीन वापरासाठीच्या मंजुरीची शिफारस काही अटींसह केलेली आहे. मात्र, या लस वापराबाबतची अंतिम मंजुरी भारताच्या औषधी महानियंत्रकालाच (DCGI) घ्यायचा आहे. हा निर्णय आज देखील घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
लशीकरण अभियान कधी होणार सुरू?
एकदा का अंतिम मंजुरी मिळाली की मग लशीकरणाची प्रक्रिया पुढील ७ ते १० दिवसांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ब्रिटनची मेडिसिन्स अॅण्ड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (MHRA) ऑक्सफर्ड विद्यापीठात वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या आणि एस्ट्रेजेनेकाने तयार केलेल्या लशीला ३० डिसेंबरला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली होती. याच लशीला भारतात कोविशिल्ड या नावाने ओळखले जाते.
देशात सुमारे ९६ हजार व्हॅक्सीनेटर्सना कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी प्रशिक्षित करण्यात आलेले असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या अंतर्गत जुलैपर्यंत प्राथमिकतेच्या आधारे ३० कोटी लोकांचे लसीकरण केले जाणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
कोविशिल्ड लसीचे ५ कोटी डोस आहेत तयार
कोविशिल्ड लशीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने आतापर्यंत कोविशिल्डच्या सुमारे ४ ते ५ कोटी लशीच्या डोसचे उत्पादन केले आहे. पुढील वर्षी कंपनीचे १० कोटी डोस तयार करण्याचे उद्दीष्ट असल्याचे कंपनीने आधीच सांगितले होते. कंपनी आणखी किती उत्पादन करेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याचे कारण म्हणजे, कोविशिल्ड लशीचे उत्पादन सरकारच्या मागणीनुसार ठरणार आहे असेही कंपनीने म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times