इस्लामाबाद: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रातांतील तोडफोड करुन आग लावण्यात आलेले हिंदू मंदिर सरकार पुन्हा बांधून देईल, अशी घोषणा पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री यांनी केली आहे. एका धर्मांध मौलवीच्या नेतृत्वात या हिंदू करून आग लावण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी २६ जणांना अटक केली होती. मंदिराची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांनी रात्रभर छापेमारी करत २६ जणांना अटक केली.

या हल्ल्यानंतर मानवी हक्क कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायाने या कृत्याचा निषेध करत सर्वांचे लक्ष वेधले. या प्रांतातील अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यास सरकार कटिबद्ध असून हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मुख्यमंत्री खान यांनी दिली. मंदिराची तोडफोड केल्या प्रकरणी कट्टरतावादी इस्लामिक पक्षाच्या ४५ लोकांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अटक केलेल्यांमध्ये जामियात उलेमा-ए-इस्लामचे नेते रहमत सलाम खट्टक यांचाही समावेश आहे.

तोडण्यात आलेले हे हिंदू मंदिर पुन्हा बांधून देण्यात यावे असे आदेश प्रांतीय सरकारने दिल्याची माहिती मुख्यमंत्री खान यांचे विशेष सहाय्यक (माहिती) आणि सरकारचे प्रवक्ते कामरान बंगश यांनी दिली. उपायुक्त आणि जिल्हा पोलिस अधिकाऱ्यानेही मंदिर बांधण्याचे आदेश दिल्याचे बंगश यांनी सांगितले.

हिंदू मंदिरावरील या हल्ल्याची दखल सुप्रीम कोर्टानेही घेतली होती. या प्रकरणाची ५ जानेवारी रोजी याची सुनावणी करण्यात येणार आहे. पाकिस्तानमधील हिंदू समुदायाने या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

हिंदू संत परमहंस महाराज यांचे हे मंदिर होते. ही घटना करक जिल्ह्यातील तेरी भागातील आहे. या मंदिरात सिंध भागातील हिंदू समुदायातील अनेक भाविक पूजा करण्यासाठी येत असतात. जमावाला चिथावणी देणाऱ्या समाजकंटकांचा शोध सुरू असून काही ठिकाणी छापेमारी सुरू असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले. हिंदू समुदायाला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास परवानगी मिळाल्यानंतर या मंदिरावर हल्ला करण्यात आले असे ‘डॉन’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here