कोल्हापूर: सहा वर्षांपासून राजकारणापासून काही प्रमाणात दूर राहिलेले माजी आमदार व पुण्यातील ऑल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटीचे सचिव हे निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत काही कार्यकर्त्यांना बळ देण्याबरोबरच काही भागांत त्यांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा ते स्वत: किंवा उमेदवारीचा झेंडा हाती घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ( )

वाचा:

पंधरा वर्षापूर्वी माजी आमदार मालोजीराजे राजकारणात सक्रीय झाले. महापालिकेत त्यांनी काही काळ काँग्रेस आघाडीचे नेतृत्व केले. त्यांना मानणाऱ्या नगरसेवकांचा एक मोठा गटही होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधले. नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपात कोल्हापूरची जागा काँग्रेसला गेल्याने यांनीच त्यांना काँग्रेसमध्ये पाठवले. कोल्हापूरकरांनी त्यांना आमदार करत तरुण चेहऱ्याला जनसेवेची संधी दिली. २००९ मध्ये नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर त्यांनी कोल्हापूरच्या राजकारणाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मैदानातच न उतरण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे सत्यजीत कदम यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. पण, क्षीरसागर पुन्हा विजयी झाले.

वाचा:

क्षीरसागर यांच्या विषयी निर्माण झालेली नाराजी आणि भाजपमध्ये त्यांच्या विषयी असलेला राग या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार, असे चित्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तयार झाले होते. याच वेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून मालोजीराजे व त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांच्या नावाची बरीच चर्चा झाली. शेवटच्या क्षणापर्यंत नाव चर्चेत होते. शेवटी दोघांनीही नकार दिल्याने उमेदवारीची माळ चंद्रकांत जाधव यांच्या गळ्यात पडली आणि ते आमदार झाले.
या सर्व पार्श्वभूमीवर दहा वर्षे कोल्हापूरच्या आणि विशेषत: महापालिकेच्या राजकारणापासून काही प्रमाणात दूर राहिलेले मालोजीराजे यावेळी मात्र पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. पुण्यातील संस्थेत पूर्णपणे लक्ष घातलेल्या मालोजीराजेंनी अचानक महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातल्याने त्याची शहरात चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा शहरात मोठा गट आहे. त्यांना मानणारे अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आहेत. यामुळे मालोजीराजेंची ताकद त्यांना मिळाल्यास त्यांच्या गटाचे अनेक नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना त्याचा फायदा होणार आहे. विधानसभा निवडणुकीला अवकाश आहे, तरीही आतापासून ते तयारीला लागले आहेत. त्यांना मानणाऱ्या काही इच्छूकांशी त्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

सध्या काँग्रेस आघाडीचे नेतृत्व पालकमंत्री हे करत आहेत. राज्यातील सत्ता आणि पालकमंत्र्यांनी शहरात बांधलेला गट, आमदार ऋतुराज पाटील यांची नव्याने निर्माण झालेली ताकद या पार्श्वभूमीवर सध्या महापालिकेत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अधिक गर्दी होत आहे. अशावेळी मालोजीराजे सक्रीय झाल्यास या पक्षाला अधिक फायदा होण्याची चिन्हे आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here