महेश गायकवाड । : मित्राची हत्या करून महाराष्ट्र सोडून फरार झालेल्या एका आरोपीला आठ वर्षानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (युनिट १) उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यातून अटक केली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी नेपाळमध्ये राहत होता. नेपाळवरून गोरखपूरला येताच गुन्हे शाखेने पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी त्याच्या मुसक्या आवळल्या असून या आरोपीला घेऊन गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेश येथून ठाण्याला निघाले आहेत. दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी गोरखपूरसह नेपाळमध्ये गुन्हे शाखेने खबरी सक्रीय केले होते. ( Update )

वाचा:

कदम्बूल उर्फ ताजामुल उर्फ ताजाज्यूल हक दुख्खू शेख या तरुणाची १० सप्टेंबर २०१२ रोजी सुऱ्याने गळा कापून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याचा मित्र याचे नाव चौकशीत समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, इनामुल सापडला नाही. गुन्हे शाखा युनिट एक मागील दोन वर्षांपासून या आरोपीचा शोध घेत होते. मूळचा पश्चिम बंगालचा असलेला हा आरोपी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी चार वेळा गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशला जाऊन आले. मात्र तो हाती लागला नाही. तरीही गुन्हे शाखा त्याच्या मागावर होती.

वाचा:

गोरखपूर तसेच नेपाळमध्ये खबऱ्यांचे जाळे सक्रीय करत गुन्हे शाखेने माहिती काढण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलीस पथकाला यश मिळाले. इनामुल नेपाळवरून गोरखपूरला येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काकड यांचे पथक गोरखपूरला रवाना झाले. या पथकाने शुक्रवारी उत्तर प्रदेश एसटीएफच्या मदतीने इनामुल याला गोरखपूर रेल्वे स्टेशनजवळून ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अशाप्रकारे मागील आठ वर्षांपासून फरारी असलेल्या या आरोपीला जेरबंद करण्यामध्ये पोलीस यशस्वी झाले. आरोपी नेपाळमध्ये राहत होता. नेपाळवरुन येणार असल्याचे कळताच आमच्या पथकाने त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here