राज्यात चार टप्प्यांत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची पूर्वतयारी म्हणून लसीकरणाची रंगीत तालीम () देशभरात राबविण्यात येत आहे. ‘करोना लसीकरणानंतर प्रत्येकाला चार सूचना केल्या जातील. लसीकरणाच्या पुढच्या डोसची तारीख त्यांना देण्यात येईल. त्यानंतर, लसीकरणानंतरच्या काळात त्यांना कसं वागावं याच्या सूचना करण्यात येतील, असं सांगतानाच राजेश टोपे यांनी लस घेतली म्हणजे करोनामुक्त झालो अशा गाफिलपणा बाळगू नका. लसीकरणानंतरही सोशल डिस्टनसिंग आणि मास्क बंधनकारक असणार आहे. लसीचे परिणाम जाणवायला दोन ते चार महिने लागू शकतात,’ अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.
‘लस घेतल्यानंतर काही जणांना थोडाफार परिणाम जाणवू शकतो, त्यांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल, जर कोणाला काही त्रास जाणवलात तर रुग्णालयात दाखल केलं जाईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. एका बूखवर शंभर जाणांना लसीकरणाचे नियोजन केले जाईल. यासाठी ओळखपत्र आणि करोना लस अॅपची पडताळणी करणारे पोलिस कर्मचारी, शिक्षक आणि मग लसीकरण केंद्र असे टप्पे नागरिकांना पार करावे लागणार,’ असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times