लंडन: स्लोवाकियाची महिला टेनिसपटू डगमारा बास्कोवावर मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी टेनिस इंटिग्रिटी युनिट (टीआययू)ने १२ वर्षाची बंदी घातली आहे. या बंदीसह बास्कोवाला ४० हजार डॉलर इतका दंड देखील केला आहे.
वाचा-
टीआययूने दिलेल्या माहितीनुसार २०१७ साली डगमाराने मॅच फिक्सिंग केले होते. डगमाराने एकूण ५ सामन्यात मॅच फिक्सिंग केले होते. जागतिक टेनिस क्रमवारीत ती एकलमध्ये १ हजार ११७ व्या तर दुहेरीमध्ये ७७७ व्या स्थानावर होती.
वाचा-
डगमाराने तिच्यावर लावण्यात आलेले आरोप मान्य केले आहेत. तिला पुढील १२ वर्ष टेनिस खेळता येणार नाही. देश किंवा जागतिक पातळीवरील कोणत्याही स्पर्धेत डगमारा सहभागी होऊ शकणार नाही. फिक्सिंग प्रकरणी सुनावणी सुरू असताना समितीने तिला करण्यात आलेला दंड कमी केला. आता तिला ९० दिवसात एक हजार डॉलर इतकी रक्कम जमा करावी लागणार आहे.
वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times