मुंबईः औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या काँग्रेसची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. या प्रकरणावरून नेत्यानं शिवसेनाला इशारा दिला आहे.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसचा विरोध राहिल, अशी ठाम भूमिका राज्याचे महसूल मंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं असल्याचा दावा विरोधी पक्षाकडून होत असताना आता काँग्रेस नेत्यानंच सत्तेत असलेल्या शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

काँग्रेस नेते यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. पण राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. युतीचं सरकार हे कॉमन मिनिमम प्रोगामच्या आधारावर चालतात कोणत्याही वैयक्तिक अजेंड्यावर नाही. हा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे नावं बदलण्यासाठी नाही,’ अशी टीका निरुपम यांनी केली आहे.

‘छत्रपती संभाजी महाराज महान योद्धा होते आणि त्यांनी केलेलं आत्मसमर्पण वंदनीय आहेच यात काही वादच नाही. पण सरकार चालवत असताना शिवसेना महापुरुषांना मध्ये आणत असेल तर यात त्यांचंच नुकसान होईल,’ असं टोला निरुपम यांनी लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here