म. टा. प्रतिनिधी, : बुद्रुक परिसरात दुचाकीची राईड न दिल्यामुळे दोघांनी पकडून तरुणाला सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

योगेश देविदास कांबळे (वय २३) आणि अश्विन भोसले (रा. हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुहास अभिमन्यू वाघमारे (वय १९, रा. वडगाव बुद्रुक) याने तक्रार दिली आहे. वडगाव बुद्रुक येथील रोकडोबा मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे वाघमारे याच्या ओळखीचे आहेत.

शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास वाघमारे व त्याचा मित्र योगेश निर्मळ हे दुचाकीवरून निघाले होते. रोकडोबा मंदिराजवळ आरोपींनी आवाज देऊन त्या दोघांना बोलवून घेतले. त्याच्याजवळ असलेली स्पोर्ट बाइकची एक राईड मागितली. पण, वाघमारे याने ती देण्यास नकार दिला. त्याचा राग कांबळे याला आला. त्याने वाघमारे याला पकडले. त्यानंतर आरोपींनी त्याच्या कपाळावर सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर दोघे निघून आले. वाघमारे याने सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी कांबळे व भोसले या दोघांना अटक केली. आरोपी हे भाजी विक्रीचे काम करतात. कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्यावर खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे हे अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here