नवी दिल्लीः चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या करोना व्हायरसवर भारतात प्रतिबंधात्मक उपाय योजण्यासाठी केंद्र सरकारची काय तयारी आहे, याची माहिती घेण्यासाठी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली.

चीनमध्ये करोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर मुंबईतही करोनाचे चार संशयित रुग्ण आढळले होते. मात्र, त्यांचे नमुने निगेटीव्ह आले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत देशातील करोना व्हायरसच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. संबंधित मंत्रालयांना करोना व्हायरससंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. या व्हायरसशी लढण्यासाठी रुग्णालये आणि प्रयोगशाळा सज्ज आहेत, अशी माहिती प्रधान सचिवांनी पंतप्रधानांना दिली.

करोना व्हायरससंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाने घेतलेल्या खबरदारीच्या उपायांची माहितीदेखील या बैठकीत प्रधान सचिव यांनी दिली. करोना व्हायरससंदर्भातील प्रत्येक घडामोडीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय बारीक लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे देशातील राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश यांच्याशी केंद्र नियमित संपर्क साधत आहेत. तसेच राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांकडून योग्य माहिती घेतली जात आहे, असेही प्रधान सचिवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले.

दरम्यान, देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील ११५ आंतरराष्ट्रीय उड्डाणांमधील सुमारे २० हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. देशातील सर्व राज्ये आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाला करोना व्हायरसबद्दल माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने २४X७ हेल्पलाइन (+९१-११-२३९७८०४६) सुरू करण्यात आली आहे. करोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला असून, १,३०० जणांना याची लागण झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here