मुंबई: पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने वाकोला येथून काल रात्री एकाला अटक केली आहे. त्याच्याकडील २०४ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. त्याची किंमत जवळपास ५१ लाख रुपये आहे.

अंमलीपदार्थ विरोधी पथकाला खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार वांद्रे युनिटने हंस भुग्रा रोडजवळ सापळा रचला आणि नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्याने कोकेन कारमध्ये लपवून ठेवले होते.

दुसरीकडे, तुळींज येथे कारवाई करून दोन युगांडाचे नागरीक असलेल्या दोन तरुणांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील २२० ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आहे. त्यात एक महिलाही आहे. ही महिला परिसरात आली असता, संशयावरून तिला ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता, तिच्याकडे मेफेड्रोन आढळून आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here