मुंबई: राज्यात आज ५१ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ३ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर २ हजार ११० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा करोना रिकव्हरी रेट ९४.६४ टक्के इतका असून सध्या एकूण ५३ हजार १३७ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री यांनी दिली आहे. ( Update )

वाचा:

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. दैनंदिन नवीन बाधित आणि करोनातून बरे होणारे रुग्ण यांत सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी चार हजारावर रुग्ण बरे होऊन घरी परतले होते मात्र, आज हा आकडा निम्म्याने खाली आला. त्यामुळे काही प्रमाणात चिंता वाढली आहे. दुसरीकडे करोना मृत्यूंचा रोजचा आकडा मात्र गेले काही दिवस कमी होताना दिसत आहे.

वाचा:

आज ५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यात आतापर्यंत या संसर्गाची लागण होऊन ४९ हजार ६३१ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. सध्या राज्यातील २.५६ टक्के एवढा आहे. राज्यात आज राज्यात ३ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २ हजार ११० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १८ लाख ३४ हजार ९३५ करोना बाधित रुग्णांनी या संसर्गावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९४.६४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २८ लाख ९० हजार ४४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ३८ हजार ८५४ (१५.०४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५८ हजार ६६८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३ हजार १५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह अर्थात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा वाढून आज ५३ हजार १३७ इतका झाला असून जिल्हानिहाय आकडेवारी पाहिल्यास त्यात जिल्ह्यात सर्वाधिक १३ हजार ७८३ अॅक्टिव्ह रुग्ण असून ठाणे जिल्ह्यात १० हजार २१० तर येथे ९ हजार २७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here