इंदूर : मुनव्वर फारुकी (Stand Up Comedian ) याला मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये अटक करण्यात आलीय. इथे आयोजित करण्यात आलेल्या एका कॉमेडी शोमध्ये यानं हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय.

भाजप कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाचा व्हिडिओ

उल्लेखनीय म्हणजे, भाजप आमदाराच्या मुलानं या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून हजेरी लावत या कार्यक्रमाचा व्हिडिओ शूट केला. तसंच कार्यक्रम मध्येच थांबवून कॉमेडियन आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. कार्यक्रमाचा व्हिडिओ पुरावा म्हणून देत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुनव्वर फारुकी आणि इतर चार जणांना अटक केलीय.

काय घडलं नेमकं?

इंदूरच्या एका कॅफेमध्ये शुक्रवारी नववर्षा निमित्तानं एका कॉमेडी शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला स्थानिक भाजप आमदार यांचा मुलगा एकलव्य सिंह गौड (३६ वर्ष) हा देखील आपल्या साथीदारांसोबत प्रेक्षक म्हणून कार्यक्रमात उपस्थित झाला होता.

मात्र, कार्यक्रमात हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करत एकलव्य सिंह गौड आणि त्याच्या साथीदारांनी कार्यक्रम मध्येच रोखत आपला विरोध दर्शवला.

तुकोगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

कार्यक्रमाचं व्हिडिओ फुटेजसोबत एकलव्यनं तुकोगंज पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार दाखल केली. यात गुजरातच्या जुनागढचा रहिवासी असलेल्या स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सोबत चार स्थानिकांविरुद्ध तक्रार करण्यात आली.

आरोपींत चार स्थानिकांचा समावेश

तुकोगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनव्वरसहीत पाच आरोपींना अटक करण्यात आलीय. यामध्ये अॅडविन एन्थनी, प्रखर व्यास, प्रियम व्यास आणि नलिन यादव या चार स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे.

या पाचही जणांविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २९५-ए (एखाद्या वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हेतूपूर्वक कृती करणे), कलम २६९ (जीवघेण्या आजाराचं संक्रमण फैलावणं) आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप आमदाराचा मुलगा म्हणतो…

‘या कार्यक्रमात कॉमेडियनकडून गोध्रा हत्याकांड तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. कॉमेड शोमध्ये अनेक आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. त्यामुळे आम्ही त्याचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर कार्यक्रम मध्येच थांबवून श्रोत्यांना कॅफेबाहेर काढलं. त्यानंतर आम्ही कॉमेडियन आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना पकडून तुकोगंज पोलीस स्टेशनमध्ये नेलं’, असं भाजप आमदाराचा मुलगा एकलव्य यानं म्हटलंय.

एकलव्य हा ” नावाच्या स्थानिक संघटनेचा संयोजक आहे. या कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हास्य कलाकलाकारांना मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात येतोय. मात्र एकलव्यनं हे आरोप फेटाळले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here