श्रीनगर : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यावद यांनी शनिवारी करोना लशीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्यानंतर एका संवेदनशील विषयाचं राजकारण सुरू झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जातेय. यांनी करोना लशीला उल्लेख ‘भाजपची लस’ असा केला होता. त्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलंय.

‘लशीचा संबंध मानवतेशी…’

‘कोविड १९ लशीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही तर या लशीचा मानवतेशी संबंध आहे’ असं मत उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केलंय.

‘मी इतर कुणाबद्दल बोलू शकत नाही परंतु, जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी आनंदानं कोविड लस घेईल’ असं ट्विट उमर अब्दुल्ला यांनी केलंय.

जितके जास्त लोक लस घेतील, तेवढंच देश आणि अर्थव्यवस्थेसाठी उत्तम होईल, असं नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय.

‘कोणत्याही लशीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. तर या लशीचा संबंध मानवतेशी आहे. संवेदनशील व्यक्तींना लवकरात लस देण्यात मिळाली तर ते अधिक चांगलं ठरेल’ असं ट्विट अब्दुल्ला यांनी केलंय.

‘आम्ही भाजपकडून लशीकरण करून घेऊ शकत नाही. आम्ही जेव्हा २०२२ मध्ये उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकून सत्तेवर येऊ तेव्हा मोफत लशीकरण करू. भाजपद्वारे लशीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या लशीवर आम्ही विश्वास ठेऊ शकत नाही’ असं वक्तव्य अखिलेश यादव यांनी केलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here