लाहोर: मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा कमांडर जकी उर रहमान लखवी ( arrested) याला शनिवारी पाकिस्तानात अटक करण्यात आली. लखवीला दहशतवादी कारवायांसाठी फंडिंग करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. लखवी हा लश्कर-ए-तोयबाचा कमांडर असून त्याचे हाफिझ सईदनंतर दहशतवादी संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. लखवी मुंबई दहशतवादी हल्लाप्रकरणी (Mumbai Attack) २०१५ पासून जामिनावर आहे. त्याला पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी विभागाने (CTD) अटक केली आहे. (zakiur rehman )

मात्र, लखवीला कोठून अटक करण्यात आली आणि त्याला कोठे ठेवण्यात आले आहे याबाबच पाकिस्तान सरकारची तपास यंत्रणा माहिती द्यायला तयार नाही. पंजाबच्या दहशतवाद विरोधी विभागाने गुप्त माहितीवर आधारित अभियानानंतर प्रतिबंधित संघटना लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जकी उर रहमान लखवी याला दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली.

कारवाईच्या मागे एफएटीएफचा दबाव तर नाही?
या अटकेमागे दहशतवादी फंडिंगच्या विरोधात काम करणारे जागतिक संघटन फायनॅन्शियल अॅक्शन टास्कफोर्सचा (FATF) दबाव असल्याचेही मानले जात आहे. टेरर फंडिंगच्या विरोधातील पाकिस्तानची कारवाई पुरेशी नसल्याचे एफएटीएफने म्हटले आहे. या संघटनेला ग्रे यादीत ठेवले असल्याचे एफएटीएफने म्हटले आहे. पाकिस्तानने जर दहशतवादी फंडिंगविरोधात कारवाई केली नाही, तर त्याला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. या अंतर्गत पाकिस्तानला अनेक प्रकारच्या वित्तीय प्रतिबंधांना समोरे जावे लागणार आहे.

दहशतवादी फंडिंगच्या रकमेतून चालवायचा डिस्पेन्सरी

लखवीवर दहशतवादी फंडिंगद्वारे मिळालेल्या पैशांद्वारे एक डिस्पेंसरी चालवण्याचा आरोप असल्याचे सीटीडीचे म्हणणे आहे. तो डिस्पेन्सरी चालवून मिळालेली रक्कम पुन्हा दहशतवादी कारवायांसाठी खर्च करतो. दहशतवादी फंडिंगद्वारे मिळालेली रक्कम तो व्यक्तिगत वापरासाठी देखील खर्च करतो. लखवी प्रतिबंधित संघटना लश्कर-ए-तोयबाचा सदस्य आहे. तसेच लखवी संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला दहशतवादी आहे. त्याच्या विरोधात लाहोरच्या दहशतवाद विरोधी कोर्टात खटला चालवला जाणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here