वाचा:
महापालिका निवडणूक तोंडावर येताच शहराच्या नामांतराच्या मागणीनं उचल खाल्ली आहे. शिवसेनेनं नामांतराची जोरदार मागणी केली आहे. तर, राज्य सरकारमधील शिवसेनेचा मित्रपक्ष काँग्रेसनं कडाडून विरोध केला आहे. त्यावरून भाजपनं शिवसेनेला घेरलं आहे. शिवसेनेनं भूमिका स्पष्ट करावी, असं भाजपनं म्हटलं आहे. त्यास ‘सामना’च्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देताना शिवसेनेनं भाजपवरलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या आणि औरंगजेब रोडचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रोड असं नामकरण करताना भाजपनं संभाजीनगरचं नामांतर का शिल्लक ठेवलं? राज्यात व केंद्रात भाजपचं सरकार असतानाही हे का झालं नाही?,’ असा प्रश्न शिवसेनेनं केला होता.
प्रवीण दरेकर यांनी त्यास उत्तर देताना शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ‘प्रत्येक गोष्टीची एक प्रशासकीय प्रक्रिया असते. एखाद्या शहराचे नामांतर करायचे असल्यास तेथील महापालिकेत प्रस्ताव मंजूर होणं गरजेचं आहे. त्यानंतर तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जातो व नंतर केंद्राकडे जातो. ही प्रक्रिया समजून न घेता प्रत्येक गोष्ट भाजपवर ढकलून मोकळं व्हायचं ही सवय शिवसेनेला लागली आहे. औरंगाबाद महापालिका शिवसेनेकडं आहे. तिथं ठरा करा. राज्य मंत्रिमंडळाकडं प्रस्ताव पाठवा आणि मग तिथून केंद्राकडं पाठवा. तिथं काही मदत लागल्यास भाजप नक्कीच करेल. मात्र, काँग्रेसनं नामांतराला विरोध केलाय. त्यामुळं शिवसेनेची अडचण झालीय. त्यापासून पळवाट म्हणून भाजपला दोष देताहेत,’ असं दरेकर म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times