म.टा. प्रतिनिधी, नागपूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते यांना कायदा माहीत नाही असे नाही. नागरिकता संशोधन कायद्याची (सीएए) माहिती असतानाही ते समाजात भीती पसरविण्याचे काम करीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते यांनी केली.

धरमपेठ शिक्षण संस्थेच्यावतीने २५ जानेवारी रोजी मनोरमाबाई मुंडले स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. धरमपेठ कन्या शाळा येथे नागरिकता संशोधन कायदा या विषयावर फडणवीस यांनी विचार मांडले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. उल्हास औरंगाबादकर, उपाध्यक्ष अॅड. संजीव देशपांडे, सचिव रत्नाकर केकतपुरे आदी उपस्थित होते.

भटक्या विमुक्तांना या देशातून कोणीच देशाबाहेर काढणार नाही. आपल्या देशात कुणालाच धर्म बघून रोजगार किंवा शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळाला नाही. मात्र जाणीवपूर्वक समाजात अस्वस्थता पसरविण्याचे काम सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले. संचालन डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी केले तर आभार रत्नाकर केकतपुरे यांनी मानले.

ते २० टक्के लोक कुठे गेले?
देशाची फाळणीच धर्माच्या आधारावर झाली. मात्र दोन्ही देशातील अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्याचा करारही करण्यात आला होता. अल्पसंख्यांकाचा विकास आणि सुरक्षिततेची जबाबदारी देशावर सोपविण्यात आली होती. याबाबत नेहरू लियाकत करारही झाला होता. मात्र आजची परिस्थिती बघीतली तर पाकिस्तानात अल्पसंख्यांकांची संख्या २३ टक्क्यांवरून केवळ ३ टक्क्यांवर आली. भारतात मात्र अल्पसंख्यांकांची संख्या ७ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर गेली. पाकिस्तानातील २० टक्के लोक गेले कुठे असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी

नागरिकता संशोधन कायद्यावर देवेंद्र फडणवीस यांचे व्याख्यान सुरू असताना काही युवकांनी मध्येच घोषणाबाजी करत सीएए कायद्याचा विरोध केला. घोषणा देतच या युवकांनी शाळेच्या परिसरात शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. अशा पद्धतीचा गोंधळ घातल्या जाऊ शकतो याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती, त्यामुळे आम्ही सतर्क होतो, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केल्याचे सांगितल्या जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here