नीतेश राणे यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. ‘शिवसेना मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी निघाला नाही. हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही. हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची आणखी मदत मिळावी म्हणून निघाला नाही. पण आता घरातली उणीदुणी बाहेर निघताहेत म्हणून मोर्चा काढला जात आहे. हाच का महाराष्ट्र धर्म आहे,’ असा सवाल नीतेश राणे यांनी केला आहे.
मागील काही दिवसांपासून ईडीनं शिवसेना नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांना काही दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. टॉप्स सेक्युरिटीशी संबंधित हे प्रकरण होते. या प्रकरणी सरनाईक कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. हे सुरू असतानाच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात समन्स बजावण्यात आलं आहे. केंद्रातील भाजपचे सरकार सूड भावनेतून शिवसेनेचे नेते व आमदारांवर ही कारवाई करत असल्याची शिवसैनिकांची भावना आहे. त्या विरोधात शिवसैनिक ५ जानेवारी रोजी रस्त्यावर उतरणार आहेत. ५ जानेवारी रोजी वर्षा राऊत चौकशीसाठी कार्यालयात हजर राहणार आहेत. त्यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक ईडीच्या कार्यालयाबाहेर जमणार असल्याचं सांगितलं जातं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times