नवी दिल्ली: नवे वर्ष सुरू होताच करोना लशीबाबत एकामागोमाग एक खुशखबर मिळताना दिसत आहे. आज भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने (DCGI) कोव्हीशील्ड आणि या दोन लशींना अतिंम मंजुरी दिली. या व्यतिरिक्त झायडस कॅडिलाची लस झायकोव्ह-डी च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. ( approves emergency use of and in india)

पंतप्रधान म्हणाले, ‘भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस’

दोन्ही लशींना मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. डीसीजीआयने सीरम इन्स्टीट्यूटच्या आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे. भारताचे अभिनंदन. आमच्या सर्व परिश्रमी वैज्ञानिक आणि इनोव्हेटर्सना शुभेच्छा, अशा शब्दांत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी केला आत्मनिर्भर भारताचा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना लशीचा मुद्दा आत्मनिर्भर भारत संकल्पनेशी जोडला. ते म्हणाले, ‘ज्या दोन करोनाविरोधी लशींना अंतिम मंजुरी मिळाली आहे, त्या दोन्ही लशी भारतात तयार झालेल्या आहेत आणि हा देशाच्या नागरिकांसाठी अभिमानाचा विषय आहे. यावरून आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्यासाठी आमचे वैज्ञानिक किती परिश्रम घेत आहेत हे दिसून येते.’

जागतिक आरोग्य संघटनेने केले स्वागत

भारतात करोना लसीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्वागत केले आहे. जागतिक आरोग्य संघटना कोविड-१९ च्या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्याच्या भारताच्या निर्णयाचे स्वागत करत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आशिया क्षेत्राच्या विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी म्हटले आहे.

नव्या वर्षाच्या शुभेच्छा- अदार पूनावाला

सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे पुण्याचे सीईओ अदार पूनावाला यांनी देखील ट्विट करत माहिती दिली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, ‘सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. कोव्हिशील्ड, भारताच्या पहिल्या कोविड-१९ लशीला मंजुरी मिळाली आहे. सुरक्षित आणि प्रभावी असलेली ही लस येणाऱ्या आठवड्यांमध्ये रोल-आउटसाठी तयार आहे.’

क्लिक करा आणि वाचा-

‘जराही संशय असता, तर मंजुरी दिली नसती’

जर सुरक्षेशी संबंधित थोडा जरी संशय असता करी कोणत्याही गोष्टीला मंजुरी दिली नसती, असे डीसीजीआयचे संचालक व्ही. जी. सोमानी यांनी म्हटले आहे. ही लस १०० टक्के सुरक्षित आहे. हलका ताप, वेदना आणि अॅलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लशीसाठी एक सर्वसामान्य बाब आहे. लशीमुळे लोक नपुंसक होतील हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असेही सोमानी यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here