मुंबईः गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या आणि बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेत्री यांच्यात खटके उडत आहेत. आता पुन्हा एकदा कंगनानं उर्मिला मातोंडकर यांच्यावर नवीन कार्यालयावरुन निशाणा साधला आहे. तर, उर्मिला यांनीही कंगनाला सडेतोड उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी खार येथे कार्यालय खरेदी केलं आहे. या कार्यालयाची किंमत पावणे चार कोटी असल्याचं सूत्रांकडून समजतं. यावरुनच कंगनानं पुन्हा एकदा उर्मिला यांना डिवचलं आहे. तसं ट्विटच कंगनानं केलं आहे.

‘भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळालं नाही. पण उर्मिला यांना काँग्रेसमुळं खूप फायदा झाला आहे. उर्मिलाजी मी स्वतःच्या मेहनतीनं घर विकत घेतलं होतं. पण काँग्रेस माझं घर तोडत आहे, असा आरोप कंगनानं केला आहे. शिवाय, भाजपला खूष करुन माझ्या हातात फक्त २५ ते ३० कोर्ट केस आल्या आहेत. मी ही तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रेसला खुष केलं असतं,’ असा टोलाही तिनं लगावला आहे.

उर्मिला मातोंडकर यांनीही कंगनाच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना तिला खडे बोल सुनावले आहेत. उर्मिला यांनी एक व्हिडिओ ट्विट करत कंगनाला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कंगनाजी, माझ्या बाबतीतचे तुमचे विचार मी ऐकले, मीच काय संपूर्ण देशानं ऐकले आहेत. संपूर्ण देशासमोर सांगतेय की, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा. सर्व कागदपत्रं घेऊन मी येते. या कागदपत्रांमध्ये २०११मध्ये स्वतःच्या मेहनतीनं अंधेरीत फ्लॅट विकत घेतल्याचा पुरावा मिळेल,’ असा खुलासा उर्मिला यांनी केला आहे.

‘२० – ३० वर्षांच्या कारकिर्दीनंतर ही संपत्ती विकत घेतली होती. त्याचे पुरावे आहेत. तसंच, मार्च २०२०मध्ये तोच फ्लॅट विकल्याची कागदपत्रं आणि पुरावे असतील. त्याच पैशातून विकत घेतलेल्या ऑफिसची कागदपत्रं असतील. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी झालेल्या व्यवहारातून ऑफिस विकत घेतलं आहे, हेही दाखवेन,’ असं स्पष्टीकरण उर्मिला मातोंडकर यांनी दिलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here