गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून अदनानला जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराचा तीव्र निषेध केला आहे. मूळ पाकिस्तानचा असल्याने मनसेचा त्याला पुरस्कार देण्याला विरोध आहे.
अमेय खोपकर यांनी लिहिलंय, ‘मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये,हे मनसे च ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा ही मनसेची मागणी आहे.’
दरम्यान, देशभरातील ११८ नामवंतांना
जाहीर करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. ‘बीजमाता’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या
, अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच
, अभिनेत्री कंगना रनौत, गायक सुरेश वाडकर, अदनान सामी आणि क्रिकेटपटू झहीर खानसह महाराष्ट्रातील ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातल्या मानकऱ्यांमध्ये अदनान सामी
महाराष्ट्रातील एकूण ११ नामवंतांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले असून त्यात अदनान सामी याचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त क्रिकेटपटू झहीर खान, डॉ. पद्मावती बंदोपाध्याय, रमण गंगाखेडकर, करण जोहर, सरिता जोशी, एकता कपूर, कंगना रनौत, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष सय्यद मेहबूब शाह कादरी ऊर्फ सय्यदभाई, डॉ. सुरेंद्र डेसा सौजा आणि सुरेश वाडकर आदींना पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times