‘ सरकारमध्ये फूट पाडण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यांच्या नामांतराचा मुद्दा काही घटकांकडून पुढे केला जातो आहे. परंतु तिन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या मुद्द्यांवर एकत्रित बसून तोडगा काढतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, आघाडीतील तिनही पक्ष पक्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही सामोपचारानं मार्ग काढू,’ असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
‘राज्यातील करोना परिस्थितीबाबतही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र आणि भारत करोनामुक्त व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांना मुंबईत क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत त्यांना करोनाच्या नवीन स्ट्रेनचे लक्षणे सापडले नव्हती त्यांना सध्या क्वारंटाइन करण्यात येत आहे,’ अशी माहित अजितदादांनी दिली आहे.
‘सरकार येत असतात, जात असतात, सूडबुद्धीने कोणी काही करू नये, ईडीप्रकरणावरुन भाजपला अजित पवारांनी टोला लगावलाय. राजकीय हस्तक्षेप न होता कायद्याने कारवाई झाली पाहिजे. काहींना राजकारण करायचं आहे, त्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times