नवी दिल्ली: भारत औषध महानियंत्रकाने (DCGI) आणि या दोन लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. यानंतर हा भारतासाठी महत्वाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया एम्सचे () संचालक (Dr Randeep Guleria) यांनी दिली आहे. या लशींच्या सुरक्षेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचे देखील डॉ. गुलेरिया यांनी उत्तर दिले आहे. लस अनेक टप्प्यांमधून गेली असल्याने चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले. ( expressed his openion on permission granted to and )

हा दिवस आमच्या देशासाठी एक महत्वाचा दिवस आहे, तसेच ही नव्या वर्षाची चांगली सुरुवात देखील आहे, असे डॉ. गुलेरिया म्हणाले. या दोन्ही लशी भारतातच तयार झालेल्या आहेत. या लशी स्वस्तही आहेत आणि त्या टोचण्यासाठी देखील सोप्या आहेत. आम्हाला लवकरच या दोन्ही लशींचा वापर सुरू करायला हवा, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.

‘सुरक्षेशी तडजोड नाही’
या लशी किती सुरक्षित आहेत?, या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, ‘जेव्हा आपण एखाद्या लशीवर विचार करतो, तेव्हा सुरक्षा सर्वात महत्वाची असते हे समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे लस विविध टप्प्यातून जाते. ती किती सुरक्षित आहे हेच तपासण्यासाठी ती विविध टप्प्यातून जात असते. यानंतरच आम्ही मानवी परीक्षणाकडे जातो. विशेषज्ञ सर्व आकडे तपासतात. त्यानंतरच लशीला मंजुरी दिली जाते.’

‘भारत बायोटेक लस आहे बॅकअप’
या दोन्ही लशींचा वापर कशा प्रकारे केला जाईल, यावर डॉ. गुलेरिया म्हणाले की, ‘आपत्कालीन स्थितीत जर अचानक रुग्णांची संख्या वाढत असेल आणि लसीकरणाची आवश्यकता निर्माण झाली असेल, तर भारत बायोटेकच्या लशीचा वापर केला जाईल. या व्यतिरिक्त जर आम्हाला सीरम इन्स्टीट्यूटच्या लशीवर जरा जरी शंका आली तर बॅकअप म्हणून तिचा प्रयोग केला जाईल.’

क्लिक करा आणि वाचा-

पुढील चाचण्या सुरूच राहणार

पुढील रणनीतीवर चर्चा करताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, ‘मंजुरी देताना विषाणूचे विविध स्ट्रेन लक्षात घेत आपत्कालीन परिस्थितीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याबरोबरच लशीच्या चाचण्या सुरूच राहतील. यामुळे आकडे मिळत राहतील. एकदा का हे आकडे आले की मग लस किती सुरक्षित आणि किती प्रभावी आहे यावर अधिक विश्वासाने चर्चा करू शकू.’

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here