टाकळीमियाँ येथे कडस्कर व काळे कुटुंबियांकडे रविवारी सायंकाळी हा विवाह समारंभ होता. तेथे जेवण घेतल्यानंतर अनेकांना उलटी, मळमळ, चक्कर येणे अशा तक्रारी सुरू झाल्या. त्यामुळे तातडीने रुग्णवाहिका बोलावून रुग्णांना राहुरी व प्रवरानगरच्या रुग्णालयांत हलविण्यात आले. यामध्ये सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
मोठ्या संख्येने रुग्णांना दाखल करण्यासाठी यंत्रणेची धावपळ उडाली. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. त्यांना राहुरी फॅक्टरी, प्रवरा नगर, नगर शहर, राहुरी ग्रामीण रुग्णालय, बाल रुग्णालय येथे उपचारांसाठी हलविण्यात आले. रुग्णवाहिका आणि मिळेल त्या वाहनांतून रुग्णांना हलविण्यात आले. जेवण घेतलेल्या बहुतेक सर्वांनाच त्रास होऊ लागल्याने सर्वांचीच मोठी धावपळ उडाली. पोलिस आणि आरोग्य पथकाला माहिती मिळताच त्यांनीही गावात धाव घेऊन मदत सुरू केली. पोलिसांनी अन्नाचे नमूने घेऊन तपास सुरू केला आहे. सरकारी रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनीही मोठी धावपळ केली. गंभीर रुग्णांना नगर शहरातील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times