नाशिकः राष्ट्रवादीचे आमदार यांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. या लग्नसोहळ्यात महाविकास आघाडीतील मंत्रीदेखील उपस्थित असल्यानं या लग्नाची चांगलीच चर्चा होतेय. तर, भाजपनं या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी विवाह सोहळे व कार्यक्रमांवर सरकारने निर्बंध लावले आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये संख्या मर्यादित असावी, असे आदेशही सरकारनं दिले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमातच सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडत असताना आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. राष्ट्रवादीचे आमदार बनकर यांच्या मुलाच्या लग्नातही असाच काहीसा प्रकार घडला आहे.

या लग्न सोहळ्यात सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष, म्हणजे या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री , अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही उपस्थिती होती. त्यामुळं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘पालकमंत्री जिल्ह्याचे प्रमुख असतात; उपमुख्यमंत्री म्हणून सरकारचे दोन नंबरचे प्रमुख आहेत, ज्यांनी कायद्याचे पालन करायचे असते तेच जर अशा प्रकारे उपस्थित राहून कायद्याची पायमल्ली करत असल्यास सामान्य माणसांनी कायद्याची अंमलबजावणी करताना कोणाचा आदर्श ठेवायचा,’ असा सवालही प्रवीण दरेकरांनी उपस्थित केलाय. टीव्ही ९ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचा विवाह पुण्यात पार पडलाय. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या लग्नसोहळ्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here