नागपूरः मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने येथे व्याघ्रसफरीचा आनंद घेतला. ताडोबा हा व्याघ्रदर्शनासाठी प्रख्यात आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांची पावले आपसूकच प्रकल्पाकडे वळतात. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचाही याला अपवाद नाही. राष्ट्रीय पर्यटनदिनाचे औचित्य साधत ताडोब्यात आलेल्या सचिन तेंडूलकरला शनिवारी वाघिणीसह चार बछड्यांनी दर्शन दिले.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने सचिन नागपुरात आला होता. क्रीडा महोत्सव संपल्यानंतर सचिन तेंडुलकरने थेट ताडोबा गाठले. प्रकल्प व्यवस्थापनाने सचिनचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. नंतर दुपारच्या सत्रात कोलारा गेटमधून प्रकल्पात जात सचिनने सफारी केली. मात्र, त्याला झाले नाही. शनिवारी सचिन पुन्हा एकदा सकाळच्या सत्रात सफारीसाठी निघाला. बफर झोनमधील मदनापूर गेटमधून प्रवेश केल्यानंतर सफारीचा आनंद घेत असताना जुनाबाई भागात वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचे सचिनला दर्शन झाले. सोबतच रानगवा, सांबर, चितळ यासह विविध वन्यप्राण्यांचेही दर्शन झाले. या व्याघ्रदर्शनाने सचिन सुखावला.

दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सत्रात कोलारा गेटमूधन सहकुटुंब सचिन सफारीसाठी गेला. या सफारीचा मनमुराद आनंद लुटला. रानगवा, सांबर, चितळ या प्राण्यांसह नवरंगी, सातभाई व स्थलांतरित पक्षी पाहिले. मात्र, त्याला व्याघ्रदर्शन झाले नाही. म्हणून सचिनने शनिवारीदेखील सफारीचा आनंद लुटला आणि त्याला व्याघ्रदर्शनही झाले. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात सचिन वनदूत होता. यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात व्याघ्रदर्शनासाठी सचिन गेला होता. व्याघ्रदर्शन झाल्याने सचिन सुखावला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here