मुंबईः गेल्या काही दिवसांत राज्यात चांगल्या थंडीला सुरुवात झाली आहे. मात्र, पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरणामुळं राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस झाला. दिल्लीतही विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं राज्यातही ६ ते ७ जानेवारी रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच, आज मुंबई सांताक्रुझ परिसरात पावसानं हजेरी लावली आहे.

उत्तर भारतात गेल्या आठवड्यात थंडीची लाट आली होती, त्यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला. मात्र, गेल्या दोन दिवसांत उत्तरेकडील राज्यात हवेची चक्राकार स्थिती असून, काही भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात बाष्प येत असल्याने थंडीचा जोर ओसरला आहे. पुढील चार दिवस प्रतिकूल वातावरणामुळे संपूर्ण राज्यातील तापमानात कमी अधिक प्रमाणात वाढ होणार आहे. येत्या सहा आणि सात जानेवारीला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असून, विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.

दरम्यान, राज्यातले किमान तापमानात येत्या ३,४ दिवसात लघु पडजड होण्याची शक्यता आहे. तसंच, मुंबई, ठाण्यात १६-१८च्या आसपास, नाशिक, पुणे १४-१६ दरम्यान व मध्य महाराष्ट्रात १८-२०°C दरम्यान असेल, असा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here